*जागतिक साहित्य कला व्यक्ती तो विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अत्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संत गाडगेबाबा महाराज.*
गाडगे महाराज
झाले महान संत,
देह झाला विलीन
ते आहेत जिवंत..।१।
शिकले नाही तरी
विद्यापीठाला नाव,
जयजयकारती
दाहिदिशांचे गाव..।२।
चिंध्या पांघरूनही
विचारनीय धन,
ठेऊन गेले आम्हां
स्वच्छ ठेवावे मन..।३।
शिक्षणाचे महत्त्व
जगाला पटविले,
पैशाला कधी त्यांनी
जवळ नाही केले..।४।
कष्ट करून जगा
सर्वांना उपदेश,
गोरगरीबांनाही
वाटून द्यावा देश..।५।
चंद्र सूर्य आहेत
जोवरी गगनात,
महाराजांचे नाव
राहील स्मरणात..।६।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*