*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वप्नांना कवेत घेता*. .
__________________________
गीत गाता आयूष्याचे
छान रंग सजवले,
घेता कवेत स्वप्नांना
ऋतू मागेची राहीले.
कधी शितल चांदण्या
कधी तप्त ऊन, छाया
कधी दु:खद त्रासात
कधी वेडीपीशी माया.
स्वप्नपूर्ती आनंदाने
कित्येकदा बावरते
घाबरूनी पुढे जाते
मागे वळूनी पहाते.
ध्यास हा स्वप्नपूर्तीचा
खडतर आयूष्याचा
आनंदात जगण्याचा
असे सार जीवनाचा.
घेऊ स्वप्नांना कवेत
जगू राहुनी मजेत
बळ पंखांचे पाठीशी
कष्ट, प्रयत्न हवेत…….
योगिनी वसंत पैठणकर नाशिक.