सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे 26 फेब्रुवारीला आयोजन
सावंतवाडी
सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे 26 फेब्रुवारीला सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत सावंतवाडीच्या राजवाडा येथे शिवचरित्रकार व अध्यक्ष हिंदवी परिवारचे डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे प्रतापगडाचा रणसंग्राम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचावा म्हणून शिवजागर चे आयोजन सावंतवाडीत 2016 पासुन करण्यात येते .यंदा हे सहावे पुष्प असून शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील अजरामर पराक्रमाची अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहित असायला हवी यासाठी प्रतापगडचा रणसंग्राम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. इतिहासातील सर्वोत्कृष्ट युद्ध असे बिरुद असलेल्या या रणसंग्रामातील बारकावे ऐकण्यासाठी नागरिकांनी तसेच शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधूमित्रचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे यांनी केले आहे.