वैभववाडी
वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थोर समाज सुधारक व प्रबोधनकार संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
संत गाडगेबाबा प्रतिमापूजन व जीवन कार्याचा आढावा घेऊन जयंती साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा महाराज यांचे जीवन व कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी अंधश्रद्धा,अज्ञान व अस्वच्छता यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केल्याचे उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ए.एम.कांबळे सांगितले. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. एन.व्ही.गवळी, मानसशास्त्राचे डॉ.आर.एम. गुलदे, इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाटील यांनीही संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. या जयंती कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डी.एस. बेटकर यांनी व्यक्त केले.