मनसे पदाधिकारी आक्रमक; बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक यांना घेराव
सावंतवाडी
धाकोरे, आजगाव,शिरोडा, वेळागर पंचक्रोशी सह बऱ्याच भागात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ होऊन आज धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांच्यासह मनसेचे माजी तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांना बुधवारी घेराव घातला. यावेळी मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले.
धाकोरे येथे मंजूर झालेला बीएसएनएलचा मोबाईल टॉवर का रद्द करण्यात आला असं सवाल धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांनी करीत शिरोडा वेळागर परिसरात बीएसएनएलचा पूर्णता बोजवारा उडाला असून फोन लावण्यासाठी ग्राहकांना शिरोडा बाजारपेठेत यावे लागते त्यामुळे आपली सेवा कधी सुधारणार असा संतप्त सवाल श्री चिपकर यांनी केला. तर अनियमित मोबाईल सेवेमुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून त्याला जबाबदार कोण असा प्रश्न मनसेचे माजी शाखाध्यक्ष श्री निलेश मुळीक यांनी केला तर विविध प्रश्नांची सरबत्ती बीएसएनएल जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांच्यावर करण्यात आली. काही ठिकाणी वीज प्रवाह खडीत झाल्यास डिझेल अभावी नेटवर्क चा प्रॉब्लेम निर्माण होत आहे. काही ठिकाणी सोमवारी लाईट नसल्यामुळे नेटवर्क साठी पूर्ण दिवस वाट बघावी लागते व त्यामुळे अनेक कामांचा खोळंबा होतो. पंचक्रोशीतील ज्या ज्या ठिकाणी नेटवर्क संबंधि ज्या काही समस्या आहेत त्या मनसेच्या पदाधिकारी यांनी प्रबंधक श्री जुन्नू यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान काही ठिकाणी उद्घाटन झालेले टॉवरही निरुपयोगी असल्याचे निदर्शनास आणून दिले. आरोस धाकोरे तिरोडा वेळागर पंचक्रोशितील इतर बीऐसएनएलचीं मोबाईल सेवा लवकरच सुरळीत केली जाणार आहे असे आश्वासन श्री जन्नू यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले तर विस्कळीत सेवा लवकरच न सुधारल्यास ग्रामस्थांसह आक्रमक पवित्र घेत कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला, मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दूरध्वनी वरून जिल्हा प्रबधक यांच्याशी चर्चा करत उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची नेटवर्क संबंधित समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली.यावेळी सरपंच स्नेहा मुळीक, मनविसे उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, माजी तालुका सचिव राजाराम चिपकर, माजी शाखा अध्यक्ष निलेश मुळीक व पदाधिकारी उपस्थित होते