You are currently viewing मडुरा, रोणापाल व इन्सुलीत मंदिर फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद

मडुरा, रोणापाल व इन्सुलीत मंदिर फोडले; चोरटे सीसीटीव्हीत कैद

बांदा

मडुरा, रोणापाल व इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. इन्सुली व रोणापाल मंदिरात चोरी करताना दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.
सर्वप्रथम चोरट्यांनी मडुरा माऊली मंदिराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फंडपेटी फोडून रोकड लंपास केली. त्यानंतर रोणापाल माऊली मंदिरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास इन्सुली माऊली मंदिर फोडले. त्यात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंदाजे विशीतील दोघे युवक दिसत आहेत. बांदा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बांदा पोलीसांसमोर चोरट्याने पकडण्याचे आव्हान आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा