मुंबई
सदर हॉटेल मधील फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट वर कार्यरत असलेले कर्मचारी आणि कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मागील काही महिन्यांपासून कामावरून अचानकपणे काढून टाकले होते.
सदर कामगारांनी म.न.का.से सरचिटणीस गजानन नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांची कैफियत मांडली, त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन दि.२७/१०/२० रोजी गजानन राणे यांच्या नेतृत्वाखाली म.न.का.से च्या शिष्टमंडळने आय.टी. सी.ग्रांट मराठा हॉटेलला धडक दिली व हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा केली, सदर चर्चेत व्यवस्थापनाने म.न.का.से च्या शिष्टमंडळास सर्व कामगारांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.
सदर चर्चेस हॉटेल व्यवस्थानेकडून जनरल मॅनेजर अतुल भल्ला व एच.आर.मॅनेजर धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. व म.न.का.से तर्फे उपाध्यक्ष – राकेश तारापूरकर, निशांत(बाळा) गायकवाड, चिटणीस – सचिन पाताडे, आण्णासाहेब लोखंडे, रेमन कोळी, राज पार्टे, उपचिटणीस – श्रीधर चिकणे देशमुख कार्यकारिणी सदस्य ऋषी सावंत, अक्षय गोरे, तेजस सारंग व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ मनोज चव्हाण आणि कार्याध्यक्ष संतोष धुरी यांचे मार्गदर्शन लाभले.