You are currently viewing कुणीच कुणाचं नसतं

कुणीच कुणाचं नसतं

*काव्य निनाद साहित्य मंच, पुणे सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कुणीच कुणाचं नसतं*

 

मानवी जन्म मिळाला भाग्याने

पण कोण सर्वसुखी असतं ?

उगीच नाही अनुभवी म्हणत

कुणीच कुणाचं नसतं 1

 

 

लहानपणी मिळते आईचे प्रेम

जन्मभर मिळते का तिची संगत?

इतर सारेच सुखाचे सोबती

कुणीच कुणाचं नसतं। २

 

आयष्यभर करावी लागते धडपड

होतात का यशस्वी सगळेजण?

दोष दाखवायला टपलेले असतात

कारण कुणीच कुणाचं नसतं। 3

 

स्वतःचा मोठेपणा दाखवितांना

दुसऱ्याचा करतात का विचार?

मीपणाचा अभिमान प्रेत्येकाला

कारण कुणीच कुणाचं नसतं 4

 

 

प्रतिभा पिटके अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा