You are currently viewing भाजपा दिंव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिंव्यांगांच्या पाल्यांना स्कूलबॅगचे वाटप

भाजपा दिंव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिंव्यांगांच्या पाल्यांना स्कूलबॅगचे वाटप

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्यावतीने स्कूलबॅॅग प्रदान..

कुडाळ :

भारतीय जनता पार्टी दिंव्यांग विकास आघाडीच्या वतीने कसाल येथिल सिद्धीविनायक हॉल मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगांच्या २० पाल्यांना स्कूलबॅॅगचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे स्वागत दिंव्यांग विकास आघाडीचे सिंधुदुर्गचे संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, दिंव्यांग आघाडीचे सहसंयोजक शामसुंदर लोट, प्रकाश वाघ, भरत परब , स्वाती राऊळ तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिंव्यांग आघाडीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दीले. तसेच दिव्यांग बांधवाना व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्या दिव्यांग बांधवानी घरकुलासाठी प्रस्ताव केलेले आहेत. गाडीसाठी प्रस्ताव केलेले आहेत. अशा दिव्यांग बांधवानी संयोजक तसेच सहसंयोजक याच्यांकडे नाव नोंदवून संघटनेच्या वतीने आपल्याकडे रितसर यादी द्या, म्हणजेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामार्फत सदर प्रस्तावांना मंजुरी घेण्यात येईल, असे आश्वासन दिलेे. तसेच जास्तीत जास्त दिव्यांग बांधवानी वेगवेगळे प्रस्ताव करून शासनाच्या सर्व योजनांचा पुरेपुर लाभ घ्याावा. तसेच ज्यांचे प्रस्ताव केलेले आहेत त्यानी भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या कार्यकारीणीकडे नाव देणे गरजेचे असल्याचे सांगीतले.

सदर कार्यक्रमात नविन पदाधिकारी नियुक्त करून त्यांना मान. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. तसेच नविनच लग्न झालेल्या मूकबधिर जोडप्याचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला.

यावेळी केळूसकर, सातोसे, निलम राणे तसेच जिल्ह्यातील दिंव्यांग तसेच त्यांची मुले उपस्थित होती. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजन झालं व अशा प्रकारे कार्यक्रम पारपडला. सर्व दिव्यांग बांधवाच्यावतीने आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा