You are currently viewing ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू :- डॉ. अमेय देसाई.

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू :- डॉ. अमेय देसाई.

वेंगुर्ला :

 

भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सह संयोजक व विधान परिषद आमदार मा. श्रीकांतजी भारतीय यांचे विश्वासू मा.डाॅ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली , या वेळी सदर स्मारक होण्यासाठी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधी यांचे मार्फत शासकीय दफ्तरी झालेला पाठपुरावा जाणून घेऊन येणाऱ्या समस्यां वर योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषद आमदार श्रीकांतजी भारतीय यांचे माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे कडे पाठपुरावा करून लवकरात लवकर गांधी स्मारक प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करू असे मनोगत व्यक्त केले. या संदर्भात शिरोडा ग्रामपंचायत ने केलेला प्रस्ताव व आता पर्यंतचा झालेला पाठपुरावा बाबत माजी सरपंच मनोज उगवेकर , माजी जि प सदस्य प्रीतेशजी राऊळ, माजी उपसरपंच राहुल गावडे , विद्यमान ग्रा. पं. सदस्य मयुरेश शिरोडकर यांनी माहिती दिली.

या वेळी डाॅ.अमेय देसाई यांनी स्मारक संदर्भात कमिटी बनवून मंत्रालयामध्ये जी काय मदत लागेल ती देण्याची आपली तयारी आहे असे आश्वासन दिले.

या वेळी भाजप,सिंधुदूर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,शिरोडा ग्रामपंचायत विद्यमान सदस्या कु.अर्चना नाईक, सौ.हेतल गावडे, भाजप रेडी,शिरोडा,आरवली शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे जगन्नाथ राणे,विदयाधर धानजी,महादेव नाईक,भाजप शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी,अनिल गावडे,बाळकृष्ण परब,भाजप शिरोडा शहर भाजप पदाधिकारी विकास परब,जितेद्र आजगांवकर,व भाजप पदाधिकारी व सदस्य,ग्रामस्थ,उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा