वैभववाडी :
वैभववाडी तालुका काँग्रेस मार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सपर्धेत 26 स्पर्धकांनी भाग घेतला. सपर्धेत भाग घेणाऱ्या शालेय स्पर्धकांसाठी छ. शिवाय महाराजांचे प्रशासन,छ. शिवाजी महाराजांचा साम्राज्य विस्तार, छ. शिवाजी महाराजांचे सहिष्णू धोरण हे तिन विषय देण्यात आले होते. स्पर्धकांनी फार चांगल्या पद्धतीने महाराजांचा इतिहास आपल्या वक्तृत्वातून सर्वांसमोर ठेवला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्राचार्य उदय दीनदयाळ, प्रा. सुरेश पाटील, गुलजार काझी यांनी काम पाहिले. सदर वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
वैभववाडी तालुक्याचे पोलीस निरीक्षक अमीत यादव प्रमुख पाहुणे म्हणून तर डाॅ. केशव पाखरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. हा कार्यक्रमाचे आयोजन वैभववाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादामीया पाटणकर आणि वैभववाडी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाताई बोडके यांनी केले होते. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सचिव आनंद परूळेकर, कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वैभववाडी तालुका काँग्रेसचे सरचिटणीस वसंत नाटेकर, दिलीप रावराणे,बाळा पांचाळ,वसीम काझी,अहमद बोबडे,साळुंखे सर, परब मॅडम, विद्यार्थी, शिवप्रेमी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.