*छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव शिवराजेश्वर मंदिरामध्ये नवीन सिंहासन बांधकाम केल्यानंतर प्रथमच शिवजयंती सोहळा साजरा*
मालवण :
संपूर्ण राज्यभर 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला याला इतिहासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असलेले शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. आम. वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाचे नवीन बांधकाम केल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला येथे प्रथमच शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. स्वराज्य महिला ढोल ताशा यांच्या गजराने वातावरण शिवमय झाले. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवे फेटे, भगवे झेंडे यामुळे किल्ले परिसर भगवमय झाला होता.
दरम्यान यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा गायन सादर करण्यात आले.तसेच लहान मुलांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा यावेळी घेण्यात आली. मालवण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच आम. वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून उभारलेला भव्य भगवा ध्वज देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
याप्रसंगी आम. वैभव नाईक यांच्या समवेत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, मंदार ओरसकर, भाई कासवकर, अनुष्का गावकर, तळगाव सरपंच लता खोत, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, मालवण महिला आघाडी तालुकाप्रमुख श्वेता सावंत, निनाक्षी शिंदे, महेंद्र माडगूत, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, उमेश मांजरेकर, रणजीत परब, वायरी सरपंच भगवान लुडबे, राजू परब व मालवण तालुक्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक व शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक शिल्पा खोत यांनी केलेल्या नियोजनाचे विशेष कौतुक केले. तसेच युवती सेनेच्या वतीने वेशभूषा व शिवजन्म सोहळा आणि आचरा येथील यशराज प्रेरणा ग्रुप यांनीही ऐतिहासिक पोवाडा सादरीकरण केले.