You are currently viewing छत्रपती शिवराया

छत्रपती शिवराया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*छत्रपती शिवराया*

 

 

रचला ज्यांनी स्वातंत्र्याचा पाया…।

धन्य धन्य ते छत्रपती शिवराया…।ध्रु।

 

सैन्य म्हणोनि जमविले मावळे..,

दूर हानले परकीय कावळे..।

रयतेसाठी झिजविली काया..,

धन्य धन्य ते छत्रपती शिवराया..।१।

 

नाही बघितले जात नी धर्म..,

जवळ केले पाहुनी त्यांचे कर्म..।

समान वाटली प्रेम नी माया..,

धन्य धन्य ते छत्रपती शिवराया..।२।

 

भवानीचा आशिर्वाद घेऊनी..,

फडकविली पताका गगनी..।

स्वाभिमानाची दिधली छाया..,

धन्य धन्य ते छत्रपती शिवराया..।३।

 

आई जिज़ाऊंच्या शब्दास दिला मान..,

पर स्त्री मानली बहिणी माते समान..।

आपण सारे हिच शिकवण अंगिकारुया..,

धन्य धन्य ते छत्रपति शिवराया..।४।

 

समतेचा उपभोग घेऊया..,

शिवरायांना वंदन करूया..।

आठवू छत्रपतींच्या शौर्या..,

धन्य धन्य ते छत्रपती शिवराया..।५।

 

 

✍🏻 *अख़्तर इब्राहिम पठाण*

*(नासिक रोड)*

*मो.:-9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा