देवगड :
कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्र यात्रोत्सवानिमित्त केंद्रिय मंत्री मा. नारायण राणे व सौ. निलमताई राणे यांनी सहकुटुंब भेट घेऊन श्री देव कुणकेश्वराची पूजा अर्चा करून दर्शन घेतले. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री राणे साहेबांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.