मुंबई :
श्री. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे सेवानिवृत्त सिनियर लिपिक श्री.रमेश रामचंद्र आडारकर (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने विरार, मुंबई येथे निधन झाले. कै.रामचंद्र गोविंद आडारकर, मूळ रा.तिरोडा यांचे ते सुपुत्र होते
मुंबई येथील श्री.सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट प्रभादेवी, दादर येथे ते नोकरीवर होते. श्री.सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मधून सिनियर लिपिक पदावरून सहा महिन्यांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा सोहम, मुलगी रिद्धी आणि वामन, शशिकांत, दिगंबर, रघुवीर व दिलीप असे पाच भाऊ व एक विवाहित बहीण अयोध्या असा परिवार आहे. अशी माहिती मुंबई येथील पत्रकार श्री.कमलाकर माणगावकर यांनी दिली. श्री.कमलाकर माणगावकर यांचे ते मामा होत.