You are currently viewing सत्याचा झाला विजय……

सत्याचा झाला विजय……

कणकवलीत शिंदे गटाकडून जल्लोष

कणकवली

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत शुक्रवारी सायंकाळी निर्णय दिला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. तर शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात येत आहे.
कणकवली मध्ये छत्रपती शिवाजी चौकात शिंदे गटाकडून फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.
यावेळी धनुष्यबाण व चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा निर्णय जाहीर होताच कणकवलीत जल्लोष करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेंद्र सावंत, शेखर राणे, भास्कर राणे,  ज्येष्ठ नेते दामू शेठ सावंत ,बाळू पारकर सुनील पारकर ,प्रशांत वनस्कर ,दीपक राऊत ,निलेश तेली सुनील हरमल्कर् ,महेश तेली आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा