शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे प्रताप भोसले यांचे आवाहन
कणकवली
शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, १९ फेब्रुवारीला प्रतिवर्षाप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चारचाकी रॅली तसेच आश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. समितीतर्फे उत्सवाचे हे सहावे वर्षे आहे. सर्व उपक्रमांमध्ये शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव प्रताप भोसले यांनी केले आहे.
१९ रोजी सकाळी १० वा. चारचाकी रॅली काढण्यात येणार आहे . रॅलीचा प्रारंभ वरवडे येथून होणार असून रॅली कलमठ बाजारपेठ येथून आप्पासाहेब पटवर्धन चौक व तेथून कणकवली बाजारपेठमार्गे शिवाजीनगर येथील शिवपुतळ्याकडे दाखल होणार आहे. तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली नरडवे रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येईल. तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.
आश्रमांना जीवनावश्यक वस्तूवाटप शिवजयंतीदिनी सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रॅलीनंतर असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रम व पणदूर येथील जीवन आनंद संचलित संविताश्रम येथे समितीतर्फे भेट देण्यात येणार आहे. दोन्ही आश्रमांनी सुचविल्यानुसार त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी तालुक्यातील काही गरजूंनाही आर्थिक मदत केली जाणार आहे.
समितीतर्फे बिडवाडी, कसवण आदींसह तालुकाभरात होत असलेल्या शिवजयंती उत्सवांनाही भेटी देण्यात येणार आहे. उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी कान्हा मालंडकर (9420210987), बाळा सावंत (7620931639), संजय साळसकर (9423939559), दिनेश सावंत (9404166365), बाबू राऊळ (9405781296) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. भोसले यांनी केले आहे.