You are currently viewing प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर वाढदिवस अभिष्टचिंतन

प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर वाढदिवस अभिष्टचिंतन

*प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर वाढदिवस अभिष्टचिंतन*

प्रेमानंद उर्फ बबनराव साळगावकर म्हणजे राजकारणातील निस्वार्थी व्यक्तिमत्व…! सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ते सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अशा विविध पदांवर गेली जवळपास तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवलेले राजकारणातील एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून बबनराव साळगावकर यांच्याकडे पाहिले जाते. आज त्यांचा वाढदिवस… प्रथमतः वाढदिवसानिमित्त बबनराव साळगावकर यांना संवाद मीडियाच्या हार्दिक शुभेच्छा….!
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात बबनराव साळगावकर यांना एक निस्वार्थी, निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असताना सावंतवाडी विधानसभेची आमदारकी लढविण्याची त्यांना संधी चालून आली होती. परंतु आयत्यावेळी मुंबई येथील व्यावसायिक शिवराम दळवी यांना शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून सावंतवाडीची उमेदवारी देण्यात आली आणि बबनराव साळगावकर यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत दीपक केसरकर यांच्या सोबत सावंतवाडी नगरपालिकेत नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आणि पुन्हा एकदा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात दीपक केसरकर यांच्याशी उघड उघड संघर्ष करत त्यांच्याच विरोधात विधानसभा लढविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी मात्र त्यांना सपशेल हार पत्करावी लागली. तेव्हापासून बबनराव साळगावकर काही काळ राजकारणापासून अलिप्त राहिले.
अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहणारे बबनराव साळगावकर यांनी अनेक वेळा जनतेच्या हितासाठी उपोषण सारखे मार्ग अवलंबून आंदोलने केली. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरिबांना बळ दिले, डोक्यावरून छप्पर गेलेल्या गरीब कुटुंबाला निवारा उभा करून दिला, अन्याय होत असलेल्या व्यापाऱ्यांना अन्यायाविरुद्ध पेटून उठून संघर्ष करण्याची ताकद दिली. त्यामुळे बबनराव साळगावकर आजही जनमानसात आपले एक वेगळे स्थान टिकून आहेत. बबनराव साळगावकर यांनी राजकीय पदाचा वापर कधीही स्वतःच्या उन्नतीसाठी केला नाही तर जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केलेला आहे. राजकीय पदाचा वापर करून आजकाल अनेकांनी करोडो रुपयांचे बंगले, महागड्या गाड्या, मोठ मोठे हॉटेल सारखे उद्योग व्यवसाय उभे केले आणि माया गोळा केली. परंतु बबनराव साळगावकर आजही जिथे होते तिथेच आहेत. कधीही त्यांनी राजकीय पदाच्या आडून संपत्ती गोळा केली नाही. त्यामुळे बबनराव साळगावकर यांचं निस्वार्थी राजकारण प्रत्येकाच्या नजरेत भरतं.
अशा या निस्वार्थी राजकीय व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस बबनराव साळगावकर यांना सावंतवाडीवासीयांकडून वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा