You are currently viewing मैत्री…!

मैत्री…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यांजली*

*मैत्री…!*

मैत्री म्हणजे
चिंच आंबड गोड
पेरूची फोड
सखी!!

कृष्ण द्रौपदीसारखे
सख्य असे असावे
धावून यावे
हाकारता!!

मैत्र वृक्षांशी
जपावे त्यांना चिरंतन
करावे रक्षण
पर्यावरणाचे!!

मैत्रीचा आदर
मनात नेहमी जाणावा
ओरखडा नसावा
मनावर!!

सागर सरिता
सांजेला दिन रजनी
मैत्रीची पर्वणी
आनंददायी!!

डोळस मैत्री
कधीही तुटत नाही
साथ राही
दृढ!!

🌷〰️〰️🤝〰️〰️🌷
अरूणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा