वारंवार प्रवाशांच्या आरोग्य तपासणी करण्यात येणाऱ्या रेल्वे चुकामुकीच्या घटना वाढत असल्याने कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे. आज मंगळवारपासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येऊ शकताता कारण कोकण रेल्वेच्या रत्नगिरी, सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात या बाबतची कडक दखल घेण्यात येणार आहे.
कोविडचा धोका अजून पूर्णतः आमलात आलेला नसून या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व कोरोना करता योग्य तपासणी करत आहे. याकरिता रेल्वेच्या निर्धारित
वेळेच्या किमान एक तास आधी स्थानकात प्रवाशांनी उपस्थित रहावं असे आव्हान रेल्वे कडून केले गेले आहे .
मात्र, काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे. आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण बजावले जाणार आहे. यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या बाहेर रहावे लागण्याची भीती आहे.
सरकार कडून वारंवार कोव्हिड चा प्रसार रोखण्या करता सूचना दिल्या जात असतात मात्र कोव्हिडचा प्रसार होऊ नये यासाठी कोकण रेल्वेने सर्व त्या खबरदारी घेण्याचे योजले आहे म्हणूनच करण्यात आलेले सर्व उपाय हे प्रवाशांच्या आरोग्याच्या हिताचे आहेत. या सगळ्यांकरिताच कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व स्थानकात अहोरात्र मेहनत घेत करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाशांची साथ अपेक्षित आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर निर्धारित वेळेपूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचा अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर तुमची ट्रेन चुकू शकते असे सांगण्यात आले आहे.