सावंतवाडीत भाजपची जिल्हा कार्यकारणी बैठक
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता प्रत्येक तालुक्यात गाव निहाय कोट्यावधी रुपयांचा विकास निधी येत आहे . कणकवली -देवगड विधानसभा मतदारसंघात जवळपास 220 कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला आहे . असा प्रत्येक तालुक्यात व मतदार संघात निधी राज्य सरकारच्या माध्यमातून येणार आहे. मात्र केंद्र व राज्य सरकार ज्या योजना अमलात आणत आहेत त्या संदर्भात प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करावा. सोशल मीडिया हे प्रभावी जनजागृतीचे माध्यम आता झाले आहे . असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले. मिशन 2024 अन होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने आजची सावंतवाडीतील भाजपची जिल्हा कार्यकारणी बैठक वैश्य भवन येथे सुरू झाली होती. या बैठकीला माजी खासदार निलेश राणे , भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत ,श्री चव्हाण, लखन सावंत भोसले, बाळू देसाई, संजू परब, आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपची जिल्हा कार्यकारणी बैठक आतापर्यंत एकाच ठिकाणी होत होती मात्र प्रदेश स्तरावरून यापुढे जिल्हा कार्यकारणी बैठक प्रत्येक तालुक्यात घेण्याचे सुचित केले . त्यानुसार भाजपचे जिल्हा कार्यकारणी बैठक प्रथमच सावंतवाडीतून घेण्यास प्रारंभ करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार राणे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना लोकांपर्यंत येत आहेत तसेच राज्य सरकार गावागावात विकास निधी देत आहेत आणि भरघोस निधी आता मिळू लागला आहे त्यामुळे शासनाच्या योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्या.. असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका निहाय पदाधिकारी उपस्थित होते.