सावंतवाडी :
श्री ईस्वटी कला क्रीडा मंडळ, कोलगाव भोमवाडी आणि मुक्ताई ॲकेडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विदयमाने कोलगाव माध्यमिक विदयालय येथे आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली बुदधिबळ स्पर्धा उत्तमरीत्या पार पडली.प्रारंभी कोलगावचे सरपंच श्री.संतोष राऊळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, उदयोजक श्री.प्रविण सावंत, कोलगाव विकास सोसायटीचे संचालक श्री.लक्ष्मण राऊळ, माजी सैनिक श्री.किरण सावंत, शिक्षक श्री.अरविंद मेस्त्री, सर्कल श्री.जगन्नाथ साईल, मुख्याध्यापिका ढोके मॅडम, अंगणवाडी सेविका पूर्वा सावंत, तृप्ती साईल, साक्षी धोंड, मंडळाचे कार्यकर्ते किसन राऊळ, महेश सावंत, अक्षय साईल, मंगलदीप पवार, आनंद कासार, राजा सावंत,इ. उपस्थित होते.
जिल्हाभरातील नव्वद स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रामुख्याने पाच वर्षाच्या मुलापासुन ज्येष्ठ स्पर्धकांचा स्पर्धेत सहभाग होता. आठ आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धकांनी स्पर्धेत उपस्थिती दर्शविली. यावेळी विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्या कोचिंग कँपमध्ये कोकणातुन निवड झालेला सावंतवाडीचा एकमेव राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडु बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर, कोलगावचा आठ वर्षीय राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडु यश प्रविण सावंत, या वर्षीच्या शालेय कॅरम स्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली सावंतवाडीची एकमेव खेळाडु साक्षी रमेश रामदुरकर आणि पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवणचा मयुुरेेश परुळेकर या ॲकेडमीच्या विदयार्थ्यांचा मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
सरपंच श्री.संतोष राऊळ यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या उपक्रमांचे कौतुक करतानाच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच यापुढे मोठी स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले. ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांनी कोलगाव मधील विदयार्थ्यांसाठी पुढील कालावधीत उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
खुला गट – प्रथम संदेश गवंडी,देवगड; द्वितीय सुश्रुत नानल,कणकवली; तृतीय बाळकृष्ण पेडणेकर,सावंतवाडी; चतुर्थ मिहीर सकपाळ,देवगड; पाचवा अभिषेक सांगळे,देवगड
विशेष दिव्यांग पारितोषिक – प्रथम मयुुरेेश परुळेकर,मालवण; द्वितीय राजाराम पाताडे,सुकळवाड
15 वर्षे मुले – प्रथम सोहम देशमुख,सावंतवाडी; द्वितीय अनुज व्हनमाने,कुडाळ; तृतीय आर्यन सामंत,भोगवे
15 वर्षे मुली – प्रथम साक्षी रामदुरकर,सावंतवाडी; द्वितीय भुमि कामत,सावंतवाडी; तृतीय सौम्या हरमलकर,सावंतवाडी;
10 वर्षे मुले – प्रथम यश सावंत,कोलगाव; द्वितीय गौरांग टोपले,सावंतवाडी; तृतीय अवनिश वेंगुर्लेकर,कोलगाव
10 वर्षे मुली – प्रथम गार्गी सावंत,कोलगाव; द्वितीय निधी गवस,सावंतवाडी; तृतीय पलक पाटणकर,सावंतवाडी
सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन पूर्वा सावंत यांनी केले.