You are currently viewing कळणेत मुजोर ठेकेदाराविरुद्ध एकनाथ नाडकर्णी आक्रमक..

कळणेत मुजोर ठेकेदाराविरुद्ध एकनाथ नाडकर्णी आक्रमक..

जनतेच्या छाताडावर पाय ठेवून चाललेल्या कुठल्याही प्रकल्पा सोबत आंम्ही नाही ; एकनाथ नाडकर्णी*

दोडामार्ग

एम एन जी एल कंपनीच्या ठेकेदाराने नुकतेच दहा तारीख ला मणेरी कलमठाणा पुलावर उपोषणावेळी सर्व पत्रकारांसमोर व दोडामार्गातील जनतेसमोर सर्वपक्षीयाविरुद्ध पैसे घेतल्याचे आरोप केले होते. त्यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष अभिजीत खांबल यांनी सदर ठेकेदारास धारेवर धरले होते. व विचारणा केली होती. कोणी कोणी किती पैसे घेतले ते सांग. त्यावेळी सदर ठेकेदाराने “तुमको नही दादा मै बाकी लोगों का बात कर रहा हूं. अभी आत्महत्या करना बाकी है” असे त्यावेळी सांगितले होते.

आज जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी एम एन जी एल च्या कामाची पाहणी केली असता ठिकठिकाणी बेकायदेशीर रित्या काम सुरू असलेले त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे एमएन जीएल चे काम बंद पाडून त्यांनी दाखवून दिलेले आहे की आम्ही कुठल्याही जनतेच्या छाताडावर पाय ठेवून चाललेल्या प्रकल्पा सोबत नाही आहोत किंवा त्यांच्याकडून कुठलीही आर्थिक देवाण घेवाण केलेली नाही आहे. आजपर्यंत स्वखर्चातून जनतेच्या हितासाठी कामे केलेली आहेत. त्यामुळे कळणे भागातील सर्वच परिसरातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यावेळी एकनाथ नाडकर्णी सोबत कळणे गावचे सरपंच अजित ऊर्फ बॉबी देसाई, सौ अनिता भिसे मॅडम व कळणे ग्रामस्थ पण उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा