कणकवली
तालुक्यातील सावडाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना आम. नितेश राणे यांच्या निदर्शनास येताच आम. नितेश राणे यांनी सोमवारी रात्री उशिरा सावडाव मध्ये भेट देत या विद्यार्थ्यांच्या पालकांशी व ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच ग्रामस्थांना धीर देखील दिला. यासंदर्भात पोलिसात अधिकाऱ्यांशी आम. नितेश राणे यांनी चर्चा करून तातडीने तपासाची चक्रे गतीने फिरवा अशा सूचना दिल्या. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. भाग यांच्यासह पोलिस अधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभूगावकर, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख राजु हिर्लेकर, भाजपा कणकवली कार्यकारणी सदस्य संदीप सावंत, वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, जानवली ग्रामपंचायत सदस्य नितीन राणे, प्रशांत राणे, महेश मेस्त्री, सावडाव सरपंच सौ वारंग, सावडाव उपसरपंच दत्ता काटे आदी उपस्थित होते.