You are currently viewing एलएलएम विधी अभ्यासक्रम मान्यतेच्या प्रस्तावात घोटाळे? 6 महिने RTI ला उत्तर नाही! मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची काँग्रेसची मागणी

एलएलएम विधी अभ्यासक्रम मान्यतेच्या प्रस्तावात घोटाळे? 6 महिने RTI ला उत्तर नाही! मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई प्रतिनिधी

एल एल एम अभ्यासक्र 2022- 23 साठी नवीन प्रस्ताव मानण्यासाठी शासनाकडे सादर केले गेले होते. त्या प्रस्तावांच्या मान्यतेमध्ये प्रचंड मनमानी झाल्याची तक्रार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते ॲड.धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.


-एल. एल. एम. विधी अभ्यासक्रम सुरू करावयाचा असल्यास सदर महाविद्यालायकडे “नॅक” मानांकन असणे आवश्यक असते.जर नॅक चे मानांकन नसेल तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग त्या प्रस्तावात ती त्रुटी दाखवतात व त्रूटीची पूर्तता 1 वर्षाच्या आत करण्याचा शेरा देऊन सदर महावियद्यालयाला मान्यता देतात.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 आणि संदर्भातील 13/9/ 2017 च्या शासन निर्णयान्वित केलेल्या कार्यपद्धतीनुसार 2022- 23 साठी नवीन अभ्यासक्रम प्रस्ताव मानण्यासाठी शासनाकडे सादर केले गेले होते. त्या प्रस्तावांच्या मान्यतेमध्ये प्रचंड मनमानी झाल्याची तक्रार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार व महाविद्यालयांनी नाव न देण्याचा अटीवर सांगितल्या नुसार छाननी करणाऱ्यांनी मनमानी करून काही महाविद्यालयांना जाणीवपूर्वक नॅक ची कमतरता दाखवून प्रस्ताव नाकारले आहेत.एका महाविद्यालयाला एक न्याय व एका महाविद्यालयाला दुसरा न्याय देण्याचे भेदभाव पूर्ण वर्तन सदर विभागाकडून झालेले आहे. हे वर्तन चुकीने झालेले नसून ह्यात विषेश ” अर्थ ” दडलेला आहे अशी टीका त्यांनी केली.

न्याय , कायदा शिकविल्या जाणाऱ्या महाविद्यालयांना शासकीय अधिकारी जर भेदभाव करत असतील मनमानी करत असतील तर सदर विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देखील जुन्नरकर यांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी केली होती . तसेच मुंबई विद्यापीठाच्या संबंधित विभागाकडे माहितीच्या अधीकारात अर्ज देखील केला होता.
परंतु सदर वोभागाच्या मंत्रांचा शपथविधी झाला नसणे , न्यायालयाच्या सूनवण्या ह्या सर्व बाबींचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गैरफायदा घेऊन कोणतीही माहिती न दिल्याने सदर प्रक्रिया रद्द करण्यासाठी ॲड.धनंजय जुन्नरकर हे न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे समजते.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ह्या प्रकरणी SIT ची चौकशी लाववावी असे निवेदन देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते ॲड. धनंजय जुन्नरकर ह्यांनी केल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा