देवगड
जामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने दिनांक 6 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे स्मृती चषक क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा महोत्सवामध्ये 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबडडी स्पर्धा व कुस्ती स्पर्धा पार पडल्या.
10 फेब्रवारी रोजी जिल्हास्तरव तालुकास्तर शुटिंग बॉल स्पर्धेचे (दिवस रात्र) आयोजन करण्यात आले यामध्ये तालुकास्तर 12 तर जिल्हास्तरावरती 16 संघांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार ॲड. अजितराव गोगटे जिल्हा व तालुका शुटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष संजय कदम यांच प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी तालुका असोसिएशनचे राजू भावे,विलास रुमडे, संतोष ढोके, शरद लाड,जिल्हा पदाधिकारी गवस,मंडळाचे अध्यक्ष राजा भुजबळ,कार्यवाह चंदू पाटकर,सदस्य विजय सडेकर,प्रसाद घाडी,कौस्तुभ जामसंडेकर,प्रविण जोग,संतोष पाटकर,प्रदिप घाडी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये रोमहर्षक लढती पहावयास मिहाल्या, शुटिंग बॉल (हॉलीबॉल) प्रेमींनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती. या स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक माणगाव संघ, व्दितीय क्रमांक मातोंड संघ,तृतीय क्रमांक नारिंग्रे संघ, चतुर्थ क्रमांक आजगांव संघ यांनी प्राप्त केला. उत्तेजनार्थ म्हणून तळेरे संघ,वेताळबांबर्डे संघ,दिर्बारामेश्वर व नांदगाव संघ यांना देण्यात आला.
तालुका स्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पडेल हॉलीबॉल संघ, व्दितीय क्रमांक नारिंग्रे संघ, यांनी प्राप्त केला. उत्तेजनार्थ बक्षीस दिर्बारामेश्वर अ संघ व वाडा हॉलीबॉल संघ यांना देणेत आले. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजय कदम,राजू भावे, बाबू लाड, भरत घाडी,विजय घाडी,विलास रुमडे,शरद लाड व तालुका असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
क्रिडा महोत्सवाचा समारोप जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेने करण्यात आला. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तर खुला गट (पुरुष व महिला ) कॅरम स्पर्धेचे दिवस रात्र आयोजन करण्यात आले होते. कॅरम स्पर्धेला सकाळी 9 वाजलेपासून सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेच्यावेळी जिल्हा असो. व तालुका असो. चे पदाधिकारी उपस्थित होते.या स्पर्धेला जिल्हा क्रिडा अधिकारी विजय शिंदे,तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असो. चे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे यांनी सदिच्छा भेट दिली.या दोनही मान्यवरांचे मंडळाच्यावतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला . सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश प्रभू,खजिनदार सानित आचरेकर,सदस्य योगेश कोळी,सदिप राणे,चित्तरंजन बाणे,मेषक राणे,चंदन दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच स्पर्धा आयोजनासाठी जिल्हा असो. चे योगेश फणसळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गौतम यादव कणकवली,व्दितीय क्रमांक सागर ढवळ कुडाळ,तृतीय क्रमांक अनिल तायशेटे तर चतुर्थ क्रमांक अर्पिता बांदेकर यांनी प्राप्त केला.