*शिवजयंतीनिमित्त मिशन आयएएसतर्फे गडचिरोली जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व पुस्तकांचे प्रकाशन*
अमरावती
येत्या 19 फेब्रुवारी 2023 रोजी येणाऱ्या शिवछत्रपती जयंती निमित्त मिशन आयएएस गडचिरोली जिल्हा शाखेने गडचिरोली ह्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानिमित्त येत्या १७ १८ १९ व 20 फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये त्यांनी गडचिरोली वडसा देसाईगंज कुरखेडा धानोरा चामोर्शी आलापल्ली भामरागड हेमलकसा कोची व अहेरी या ठिकाणी असलेल्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये व आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी त्यांनी अमरावतीचे स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे व औरंगाबादचे विभागीय सहनिबंधक श्री के ई हरिदास यांना निमंत्रित केले आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज येथे दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त मिशन आयएएसस गडचिरोली शाखेतर्फे स्पर्धा परीक्षेची एबीसीडी, एबीसीडी आँफ आय.ए.एस. व सक्सेस स्टोरीज ऑफ आयएएस ऑफिसर या तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे .यापूर्वी मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी व सध्या कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री राहुल रेखावार तसेच दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असणारे श्री उदय चौधरी व श्री विजय राठोड अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली 37 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा विविध आदिवासी आश्रम शाळा व आदिवासी वस्तीगृहांमध्ये घेतलेल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा कडे गोडी निर्माण व्हावी व त्यांनी प्रशासनात यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विद्यार्थी सेनेचे सरसेनापती व मिशन आयएएस गडचिरोली जिल्ह्याचे संचालक श्री नंदूभाऊ नरोटे यांनी केले आहे .श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विद्यार्थी सेनेने पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा सप्ताह आयोजित केल्याबद्दल नागपूर विभागाचे आदिवासी विभागाचे अपर आयुक्त व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री रवींद्र ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून या उपक्रमासाठी सर्व सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील शाळांना व वसतीगृहांना केले आहे. प्रकाशनार्थ प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003