You are currently viewing प्रेमाचा वसंत

प्रेमाचा वसंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री लिखित अप्रतिम काव्यरचना*

*शिर्षक:– प्रेमाचा वसंत.*

🌹❤️🌹❤️🌹❤️🌹

प्रेमाचा वसंत बघा कसा
दोघांच्या प्रेमानेच फुलतो,
आणि सगळा आसमंत हा
सर्व जगाला सुद्धा भुलतो..।१।

आनंदते मन सगळ्यांचे
प्रेमाच्या झोक्यात झुलतांना,
तरंग उठती देहामध्ये
हृदयी वसंत फुलतांना..।२।

राजकुमार घोड्यावरूनी
येतो स्वप्नी राजकुमारीच्या,
काम नराचे असते सदा
प्रेमात पडावे या नारीच्या..।३।

तरूणाला तरूणी दिसता
तारूण्य आपले आठवते,
रक्त शरीरामधले सारे
एका बिंदूवर साठवते…।४।

या क्रियेला म्हणती जग हे
प्रेमाची सुरुवात हि झाली,
दोघांच्याही अंगामधूनीया
ही प्रेम गंगा वाहत आली…।५।

आता विसरूनी चराचर
विलीन होती एकमेकांत,
बघता बघता दोघांचेही
प्रियाराधन चाले झोकात…।६।

✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा