You are currently viewing बांद्यात २० फेब्रुवारीला जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन…

बांद्यात २० फेब्रुवारीला जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन…

बांदा

येथे “द बी. एफ. सी. क्लासिक” भव्य जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा २० फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. ‘बांदेश्वर फिटनेस क्लब’ च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.
ही स्पर्धा मेन फिजिक्स आणि बॉडिबिल्डिंग अश्या दोन प्रकारे असेल. मेन फिजिक्स मध्ये टॉप १० नंबर काढले जातील आणि बॉडीबिल्डिंग ही ५० ते ५५, ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७० आणि ७०+ खुला अश्या वजनी गटा मध्ये खेळवली जाणार आहे.तरी जिल्यातील जास्तीत-जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन या खेळाची रंगत अजून वाढवावी, असे आवाहन संदेश सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा