सुमंगलम्’ पंचमहाभूत लोकोत्सव देशाला दिशा देणारा उत्सव ठरेल :
सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक सिदगिरीत येतील: – मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
१३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या सिद्धगिरीमठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आली आहे.या तयारीच्या पाहणीसाठी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सिद्धगिरी मठावर आले होते, त्यावेळी पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी हे उद्गार काढले. यावेळी त्यांनी आद्य काडसिद्धेश्वरमहाराजांच्या प्राचीन मंदिरात दर्शन घेवून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मठाने आज पर्यंत आध्यात्मासोबातच कृषी, पारंपरिक शिक्षण, आरोग्य, महिलासबलीकरण, संस्कृतीरक्षण, गो-स्वर्धन, संशोधन आणि आपत्ती व्यस्थापन अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याच शृंखलेत आता पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार‘पर्यवरणरक्षणासाठी’ जगालादीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक होईल असा सुमंगलम पंचमहाभूतलोकोत्सव आयोजित केला आहे. आज पर्यावरणीय हानीच्या अनेक घटना आपण पाहत आहोत. त्सुनामी, अति वृष्टि, भूकंप, महापूर या सारख्या अनेक समस्याना आज जगाला तोंड द्यावे लागत आहे. आपण आज अशा उंबरठ्यावर उभे आहोत कि, आज जर आपण निसर्गाचा सर्वार्थाने विचार नाही केला तर येणाऱ्या काळात जगाला गंभीर पर्यावरणीय समस्याना सामोरे जावे लागू शकते. यासाठी आपण जागृती करणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार कोल्हापुरातील सिद्धगिरी मठ येथे सुमंगलम् हा पर्यावरणीय लोकोत्सव होत आहे ही आपल्या राज्यासाठी गौरवाची बाब आहे.
सुमारे ६५०एकर इतक्या विशाल परिसरात उत्सवाची तयारी सुरू असून ही तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. या उत्सवाला ३० ते ४० लाख लोक सहभागी होणार आहेत अशी शक्यता ग्रहित धरून शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून नियोजनासाठी सिद्धगिरी मठाला सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे व यापुढे हि मदत राहील.”
यावेळी बोलताना शिक्षणमंत्री मा.दिपकजी केसरकर म्हणाले, “या लोकोत्सवात प्रामुख्याने पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या तत्वाचे मूळ स्वरूप, त्यात मानवाने केलेले अतिक्रमण व भविष्यात आपण पुनः ही तत्व मूळ स्वरूपात आणण्यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी जागृतीचा जागर सात दिवस केला जाणार आहे. यासाठीप्रत्येक तत्वाच्या प्रदर्शनी (गॅलरी) उभारण्यात आलेल्या आहेत.भारतीय परंपरा आणि जीवन शैली यांचे जतन करत येणाऱ्यां पिढीला आपण सात्विक जीवन प्रदान करणे यासाठी विविध माध्यमांच्याद्वारे प्रदर्शनी (गॅलरी) सिद्धगिरी मठावर साकार होत आहेत. यात अनेक गोष्टी बारकाव्याने सादर केल्यामुळे या उत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक घटका पर्यंत हा पर्यावरण रक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे निश्चितच पोहचणार आहे तसेच भारताच्या परांपरीक ज्ञानाची व त्यासंबंधी विविध संशोधन कार्याची ओळख सहभागी लोकांना होणार आहे. समाजाभिमुख कार्य करणारा मठ म्हणून सिद्धगिरी मठाकडे आज पाहिले जाते.हा जागृतीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी सिद्धगिरी मठच्या सोबत महाराष्ट्र शासनसक्रीय सहभागी राहील.”
या उत्सवा बद्दल सांगताना पुज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, “या उत्सवात पारंपरिकसेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे रोल मॉडेल प्रत्यक्षात पाहता येणार आहे .देशी बियाणे, जैवीक खत , जैविककिड नियंत्रक प्रक्रिया समजून घेता येणार आहेत. त्यामुळेरासायनिक विषमुक्त अन्न-धान्याकडे टाकलेले ते एक समग्र पाऊल ठरेल. तसेचदेशात पहिल्यांदाच देशी प्रजातीच्या गाई ,म्हैशी, बकऱ्या, घोडे, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन हि भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्याप्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल. या उत्सवात देश भरातील परंपारीक वैद्य सहभागी होणार असून लुप्त होणारी भारतीय चिकित्सा पद्धत टिकवण्यासाठी वैद्यांचे संमेलन होणार आहे. भारतीय चिकित्सा पद्धतीचा लाभ हि उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना घेता येईल .या उत्सवात जगभरातील ५० देशातून नामवंत संशोधक, अभ्यासक आवर्जून या उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह ५०० विद्यापीठांचे कुलगुरू, देशभरातीलहजारो संत-महंत, विविध समाज सेवी संस्था सहभागी होणार आहेत. लाखो लोकांना जेवण, पाणी, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत विस्तृत परिसरात त्याचे नियोजन करण्यात आले आहे.”
असे बोलून स्वामीजींनी उत्सवात सहभागी होणाऱ्या लोकांना काडसिदेश्वर स्वामीजींनी सोबत एक किलो प्लास्टिक कचरा सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. येथे गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून रिसायकलिंग युनिट द्वारे त्या कचऱ्याचे पुनर्निमिती प्रक्रिया लोकांना पाहता येणार आहे . यामुळे समाजातील युवकांना एक नवीन दिशा निश्चितच मिळू शकते वयामाध्यमातून प्लास्टिक कचऱ्याच्या भीषण समस्यांना एक पर्याय मिळू शकतो.
यावेळी मा.मुख्यमंत्र्यांनी ६५० एकर परिसरात होणाऱ्या सुमंगलम कार्यक्रम स्थळाला भेट दिली. त्यांनी यावेळी पृथ्वी,जल,अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांच्या गॅलरी, मुख्य सभा मंडप सोबतच सोळा संस्कार, आरोग्य अशा गॅलरीना हि भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी सिद्धगिरी गोशाळा, सिद्धगिरी हॉस्पिटल व सिद्धगिरी गुरुकुलमळा भेट देवून मठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली, व मठावर होणाऱ्या लोकोपयोगी प्रकल्पांचे कौतुक केले. सिद्धगिरी गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोर प्राचीन १४ विद्या व ६४ कलांचे प्रात्यक्षिक सादर केले.ते पाहून मा. मुख्यमंत्र्यांनी अशा अभिनव शिक्षण पद्धतीची आजच्या पिढीला खरी गरज असल्याचे प्रतिपादित केले. यावेळी खा.संजय मंडलिक, आ.प्रकाश अबिटकर, राजेश क्षीरसागार, अमल महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे, सिद्धगिरीचे विश्वस्त उदय सावंत,संतोष पाटील, डॉ.संदीप पाटील, शंकर पाटील, माणिक पाटील चुयेकर, प्रताप कोंडेकर, डॉ.विवेक हळदवणेकर, गुंडूवडड, यशोवर्धन बारामतीकर,डॉ.रवींद्र सिंग, मदन कुलकर्णी, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील यांच्यासह मठाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.