You are currently viewing कणकवलीत कार आणि एसटी बसमध्ये तिहेरी अपघात

कणकवलीत कार आणि एसटी बसमध्ये तिहेरी अपघात

कणकवलीत कार आणि एसटी बसमध्ये तिहेरी अपघात

कणकवली

शहरातील नॅशनल हायवेवरील गांगोमंदिर सर्व्हिस रोडवर पुढे जात असलेल्या आय टेन कार ला मागून एसटी बसने जोरदार धडक दिली. त्यानंतर अपघातग्रस्त कार पुढे जात असलेल्या दुसऱ्या एसटी बसवर आदळून तिहेरी अपघात घडला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गांगोमंदिर नजीक सर्व्हिस रोडवर घडला. डॉ नयना शेट्टी ह्या आपल्या ताब्यातील आय टेन कार क्र. MH 07 AG 4378 घेऊन कलमठ च्या दिशेने जात होत्या त्यावेळी पणजीहून कोल्हापुर ला जाणाऱ्या एसटी बसची जोरात धडक शेट्टी यांच्या कार ला मागून बसली. यानंतर शेट्टी यांची कार पुढे देवरुख ला जात असलेल्या एस्टीवर आदळली. यात डॉ. शेट्टी यांच्या कारचे दर्शनी भागासह मोठे नुकसान झाले आहे. सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. हवालदार राजेंद्र नानचे यांनी अपघातस्थळी जात प्राथमिक पाहणी करत वाहतूक सुरळीत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा