You are currently viewing सिद्धार्थनगराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार – समीर नलावडे

सिद्धार्थनगराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार – समीर नलावडे

सिद्धार्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व समाजभवनाचे उद्घाटन

कणकवली

कणकवली नगरपंचायतीने सिद्धार्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व समाजभवन उभारले आहे. त्याचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) शाखा सिद्धार्थनगर व बौद्ध विकास मंडळातर्फे आयोजित केला होता. या भवनाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका उर्मी जाधव, भिक्खू विशब्द बोधी, माजी नगरसेविका विशाखा कांबळे, जयश्री कांबळे, माजी नगरसेवक गौतम खुडकर, भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय सचिव विजय जाधव, भा.बौ. महासंघाचे मुंबई प्रदेश संघटक सुरेश कांबळे, भा. बौ. महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, भाऊ कदम, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र कासार्डेकर, यशवंत चौकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात मोटारसायकल रॅलीने करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत धम्मपूजा पाठ झाला. समता सैनिक दलाने संचलन केले.

याप्रसंगी समीर नलावडे म्हणाले, नगरपंचायतीच्या माध्यमातून सिद्धार्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व समजाभवन उभारण्यात आले आहे. या भवनांचा उपयोग समाजोपयोगी कामांसाठी केला पाहिजे. ही दोन भवने उभी राहण्यासाठी विशाखा कांबळे, गौतम खुडकर, उर्मी जाधव यांचे योगदान मोठे असून या मंडळींचे शहराच्या विकासासाठीही योगदान आहे. सिद्धार्थनगराच्या विकासासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भविष्यात निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिद्धार्थनगर महिलांनी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योग सुरु केले पाहिजेत. हे उद्योग सुरु करण्यासाठी आपणास जे जे सहकार्य माझे किंवा नगरपंचायतीचे लागेल ते सहकार्य करण्यास मी सदैव तयार आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या भवनांचा उपयोग समाजहितासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आचार बौद्धसमाजातील युवा पिढीने आत्मसात करून डॉ. आंबेडकर यांचा कार्याचा वसा पुढे न्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या भवनांसाठी जमिन दिलेल्या सुमित्रा कांबळे यांचा समीर नलावडे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सुमित्रा कांबळे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे समाजभवन व सांस्कृतिक भवन उभारल्याबद्दल आभार मानत भावूक झाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश कांबळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्धबांधव व नागरिक

प्रतिक्रिया व्यक्त करा