You are currently viewing निरवडेतील भाजपासह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बांधले “शिवबंधन”

निरवडेतील भाजपासह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बांधले “शिवबंधन”

सावंतवाडी

निरवडे येथील विद्यमान सदस्य दशरथ मल्हार यांच्यासह माजी सदस्य संदीप पांढरे यांच्यासह तब्बल बारा वाड्यातील सुमारे साडे सहाशेहून अधिक भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुका प्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, विधानसभा समन्वयक अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,राजू नाईक, दोडामार्गचे बाबुराव धुरी, शब्बीर मणियर,राजू मुळीक,आबा सावंत,राजू मुळीक, सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, संजय तानावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. विधानसभा मतदारसंघात आजच्या दिवसा पासून परिवर्तनाची लाट उसळली आहे ते निरवडे येथील कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. तालुका प्रमुख रूपेश राऊळ म्हणाले निरवडे गावाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या वर विश्वास ठेवून प्रवेश केला त्यामुळे मतदार संघात आगामी काळात झंझावात निर्माण होईल. मतदार संघाचे समन्वयक अतुल रावराणे म्हणाले, शिवसेना आणि कोकण हे अभेद्य नाते आपण आज दाखवून दिले. शिवसैनिक समाजकारणाला महत्त्व देते.
यावेळी माजी सरपंच सुभाष मयेकर, माजी सदस्य संदीप पांढरे, माजी उपसरपंच मुरारजी भाइडकर, माजी सदस्य मिलन बाईत, माजी सदस्य सुप्रिया निरवडेकर, सामाजिक कार्यकर्ते वनिता सातार्डेकर, विद्यमान सदस्य दशरथ मल्हार, रेश्मा पांढरे, प्रगती शेटकर, प्रिया निरवडेकर, विजय धारगळकर, रवींद्र नाईक,अपक्ष उमेदवार सरपंच त्रिवेणी नाईक, सिताराम बांदिवडेकर, गीतांजली मयेकर,आरती बर्डे, विजय सातार्डेकर, वैशाली मातोंडकर, लक्ष्मी नेमळेकर, श्रीराम पेडणेकर, सूर्यकांत सावंत, प्रमोद बर्डे, महादेव नेमळेकर, बंटी सावंत, भगवान सावंत, बाळकृष्ण पारकर, मनोहर पारकर, शरद पारकर, दादा भाईडकर, रमेश कुबल, विजय पांढरे, श्रद्धा भाईडकर, श्याम बांदिवडेकर, विलास पालेकर, बापू भाईडडकर, संदेश शेटकर, प्रकाश भाईडकर, चंद्रकांत भाईडकर,रुपेश भाईडकर, मधुकर भाईडकर ,राजन भाईडकर, उमेश भाईडकर, विनायक कोणापालकर, सचिन मुळीक, विजय सातार्डेकर ,राजश्री सातार्डेकर, नमिता सातार्डेकर, सुनिता सातार्डेकर, राकेश सातार्डेकर, निलेश सातार्डेकर, विघ्नेश सातार्डेकर, शिल्पा पालकर, अनुजा पांढरे, शितल बांदिवडेकर, प्रभाकर बाईन, साक्षी भाईडकर, सुचिता मल्हार, रोशन मल्हार ,विवेक मल्हार ,सत्यम मल्हार, रोहन मल्हार, राजेश भाईडकर, संतोष निरवडेकर, रमेश निरवडेकर, अशोक निरवडेकर, प्रतीक्षा निरवडेकर, देवयानी निरवडेकर, प्रियांका मल्हार,रिया मल्हार ,सुरज बाईत, एकनाथ बाईत, अमित गावडे, अस्मिता वैज, जयश्री भाईडकर, अर्चना वैज,वैशाली भाईडकर, सुनील मल्हार, एकनाथ जाधव, बाबुराव जाधव, भीमसेन जाधव, बबन जाधव, प्रसाद जाधव, चंदू जाधव, न्हानु जाधव, श्याम जाधव, देवू जाधव, सुरज जाधव, आनंद माळकर, भरत माळकर, संतोष माळकर, दत्तगुरु माळकर, राजन माळकर, गणपत जाधव, रामा जाधव, सुनील जाधव, प्रकाश जाधव, शुभम जाधव, प्रेरणा जाधव, सिद्धी जाधव, शितल जाधव, समीक्षा जाधव, अजय तानावडे, संजय तानावडे, बाळा गोवेकर, वर्षा गोवेकर, सुरज शिरोडकर, दिलीप शिरोडकर, प्रमोद पेडणेकर, स्मिता पेडणेकर,साक्षी शिरोडकर आदी कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा