महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका सचिव आबा चिपकर यांचा निर्वाणीचा इशारा.
वेंगुर्ला
गेल्या कित्येक महिन्या पासुन वेंगुर्ला तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोबईल नेटवर्क ची समस्या निर्माण होत आहे. स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मात्र या कडे दुर्लक्ष करत आहेत.
शिरोडा, रेडी व आरवली भागात मोठ्या प्रमाणावर देशातील तसेच विदेशातील पर्यटक या भागात येतात मात्र या भागात मोबाईलला नेटवर्क सुविधा नसल्याने त्यांची तेथे गैरसोय होते. पर्यटकांना फोन करण्यासाठी शिरोडा मार्केट मध्ये टॉवर च्या शेजारी जाऊन फोन लावावे लागतात.तसेच स्थानिक लोकांचे फोन संपर्क साधण्यासाठी वापरावे लागतात ही तेथील सत्ताधारी व विरोधी पक्षांना लाजवेल अशी गोष्ट आहे.सत्ताधारी व विरोधी पक्ष विकासाच्या नावावर भकास करत आहेत. पर्यटन संपन्न असलेल्या वेंगुर्ला तालुक्याची तेथील स्थानिक आमदार, खासदार व लोक्रतिनिधींनी दैनिय अवस्था केली आहे.
सत्ताधऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मोबाईल टॉवर दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्याळ आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ल्या तालुक्याचे माजी सचीव आबा चिपकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.