You are currently viewing जगण्याचा जीडीपी ! माझं बजेट!

जगण्याचा जीडीपी ! माझं बजेट!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम*

*जगण्याचा जीडीपी ! माझं बजेट!*

चलनवाढी सोबत भरभर
माझं वय ही आहे वाढत
तुट वाढते दिवसेंदिवस
भांडवली अनुभवाच गाठोड आहे सोबत
माझ्या विचारांचा निर्देशांक
अधून मधून उसळून येतो
माझ्या जगण्याचा जीडीपी
सरचार्ज माझ्याकडूनच वसूल करतो..!
अर्थसंकल्पाच तस मला
आजवर फारस काही समजलं नाही
सर्वोत्तम बजेट!फसलेलं बजेट !असो
माझा जीडीपी काही वर गेला नाही..!
तरीही बजेटवर काहीही मत ठोकून देतो
कारण! मी आहे या पुण्याचा …
माझ्या जगण्याचा जीडीपी बोंबलला
तरीही हक्क राखून ठेवला बोंबलण्याचा
या आनंदातच!भिका-याच्या हातात
एक रूपयाचं नाण बळबळं कोंबलं
तेच नाण त्याने माझ्या हातावर ठेवलं
अन् म्हणाला साहेब!लाजवू नका..
रूपया असा आला आणि असा गेला..!
रूपयाची भिका-याला किंमत नव्हती
माझ्या बजेटमध्ये त्याला किंमत होती
टीव्हीवरची संबलपुरी साडीतली बाई
डोळ्यापुढे चमकली…लोकसभेतील!
जगण्याच्या जीडीपीने उसळी घेतली !भिका-याला नमस्कार केला..!
अर्थसंकल्प किती साधा अन् सोपा
भिका-याचे मनोमनी आभार मानले
रूपया असा आला नी असा गेला ..!
माझ्या जीडीपीतला रूपया आनंदाने
परत खिशात घातला….!!!!
एका रूपयात शाळेत ! बाल्कनीत बसून पिक्चर्स बघत होतो…
तेव्हा जीडीपी माहीत नव्हता…!

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा