कुडाळ येथे २६ रोजी युवाईचा युवामहोत्सव; धीरज परब मित्रमंडळाचे आयोजन
कुडाळ
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सांय. ५ या वेळेत कॅालेजमधील (१५ वर्षावरील) मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने भव्य युवा महोत्सवाचे आयोजन धीरज परब मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे. महोत्सवातील स्पर्धेत सहभागी होऊन युवकांच्या कलागुणांना मनोरंजनाबरोबरच एक चांगले व्यासपीठ मिळावे हा मंडळाचा हेतु असून सदर महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅालेज विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे तसेच उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
यापुर्वी धीरज परब मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजीक, सांस्कृतीक, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक शिबीरे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पिंगुळी व साळगाव येथे भव्य आरोग्य शिबीर भरवून यामध्ये खासगी सेवा देणारे तज्ञ डॅाक्टर यांना एकाच छताखाली आणून ग्रामीण भागात रुग्ण सेवा देण्याचा उपक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आला. रक्ततपासणी, डोळेतपासणी, मोफत औषधे असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येकी ४०० हुन अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला होता.
लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने पहिली ते पाचवी पर्यतच्या मुंलासाठी बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते सांय. ५ या वेळेत वत्कृत्वस्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाढे पाढांतर स्पर्धा अशा विवीध स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
त्याचप्रमाणे मुलांचा स्पर्धा परिक्षेत सहभाग वाढावा म्हणुन स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पंचवीस हजार रुपये कींमतीची पुस्तके मंडळाच्या माध्यमातून टोपीवाला वाचनालय, कुडाळ यांना देण्यात आली, या पुस्तकांचा मुले आज विनामुल्य वापर करत आहेत.
यावर्षीच्या महोत्सवातील स्पर्धेचे स्वरुप पुढील प्रमाणे..
समुह नृत्य स्पर्धा
1) प्रथम पारीतोषीक 5 हजार रुपये
2) व्दितीय पारीतोषीक 4 हजार रुपये
3) तृतीय पारीतोषीक 3 हजार रुपये
स्कीट स्पर्धा
1) प्रथम पारीतोषीक 4 हजार रुपये
2) व्दितीय पारीतोषीक 3 हजार रुपये
3) तृतीय पारीतोषीक 2 हजार रुपये
एकेरी नृत्यस्पर्धा
1) प्रथम पारीतोषीक 3 हजार रुपये
2) व्दितीय पारीतोषीक 2 हजार रुपये
3) तृतीय पारीतोषीक 1 हजार रुपये
एकेरी गायन स्पर्धा
1) प्रथम पारीतोषीक 3 हजार रुपये
2) व्दितीय पारीतोषीक 2 हजार रुपये
3) तृतीय पारीतोषीक 1 हजार रुपये
त्याबरोबरच ‘विनर ऑफ दि कॅालेजीस’ अर्थात मानाचा करंडक देऊन विजेत्या कॅालेजला सन्मानीत करण्यात येणार आहे.
तसेच प्रेक्षक व सहभागी विद्यार्थ्यांसाठी दुपारी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. वेळेअभावी प्रवेश मर्यादीत असुन नाव नोंदणी दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सांय ५ वाजेपर्यत करावयाची आहे. महोत्सवा दरम्यान कुठलेही, कसलेही प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले नाही. दरम्यान सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तिपत्र देण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांनी आधारकार्ड व कॅालेजच ओळखपत्र दाखवणे बंधनकारक राहणार आहे. तसेच उपस्थित प्रेक्षकांमधुन लकी ड्रॉ आकर्षक बक्षिसे असणार आहेत.
रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत कुडाळ उद्यमनगर येथील हॅाटेल आरएसएन च्या पाठीमागील वासुदेवानंद ट्रेड सेंटर या ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच्याव्यतिरिक्त अधिक माहिती साठी सचिन गुंड मो. 9637833638 आणि वेदांग कुडतरकर मो. 8329951261, 9823393977 यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले असून जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन धीरज परब मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.