You are currently viewing कुडाळमध्ये जलजीवन मिशन योजनेतील कामांच्या भूमीपूजनांचा धूमधडाका

कुडाळमध्ये जलजीवन मिशन योजनेतील कामांच्या भूमीपूजनांचा धूमधडाका

*झाराप, उपवडे, अणाव गावातील नळपाणी योजनेच्या ४.५० कोटींच्या कामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन*

कुडाळ :

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या जलजीवन मिशन आराखड्याअंतर्गत आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मालवण तालुक्यात नळपाणी योजनेची सर्वाधिक कामे व सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. या कामांची कार्यवाही पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामांना सुरवात झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कुडाळ तालुक्यातील झाराप येथे नळयोजनेच्या कामासाठी १ कोटी निधी, अणाव येथे १ कोटी ४७ लाख निधी तर उपवडे येथे २ कोटीचा निधी अशा एकूण ४.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन गुरुवारी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 

नळपाणी योजनेमुळे या गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जलजीवन मिशन योजना पुढील २० वर्षे राबविण्यात येणार असून गावच्या सरपंच व सदस्यांनी यांचे योग्य पध्दतीने नियोजन करावे तसेच कामाची गुणवत्ता राहिले पाहिजे. अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिल्या.

 

यावेळी झाराप येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, माजी सरपंच स्वाती तेंडोलकर, अशपाक कुडाळकर,गुरुप्रसाद पेंडूरकर, अनिकेत तेंडोलकर,दादा मांजरेकर,तनया मांजरेकर, विशाखा गोडे,स्वाती मांजरेकर, चंदू मुंडये,अमोल तेली,प्रसाद बोभाटे,मनीष बोभाटे,नारायण गोडे,प्रकाश गोडे,विवेक वराडकर,आबा वराडकर,विकी वराडकर आदी उपस्थित होते.

अणाव येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी उपसभापती जयभारत पालव, उपतालुकप्रमुख बाळू पालव,पावशी माजी उपसरपंच दीपक आंगणे,अणाव सरपंच लीलाधर अणावकर,उपसरपंच सौ.अणावकर,ग्रा.प.सदस्य मृणाल परब, बाबल परब, गजानन कुलकर्णी,विकास अणावकर, शिवराम अणावकर,प्रताप साईल,महेश परब आदी उपस्थित होते.

तर उपवडे येथे माजी जी.प. सदस्य राजू कविटकर, माजी जी.प. सदस्य रमाकांत ताम्हणेकर, माजी उपसभापती श्रेया परब, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, घावनळे विभागप्रमुख रामा धुरी, वसोली ग्रुप ग्रा. प. सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस,हळदीचे नेरूर उपसरपंच गणपत परब, पुळास सरपंच सौ. निकम, बाळकृष्ण दळवी, विश्राम दळवी,संतोष राऊळ, महादेव राऊळ, गोपाळ सावंत, सखाराम पालकर, कृष्णा गवस, अनंत नाईक, विष्णू भरडे, दिनकर म्हाडगूत, विनया निकम, महेंद्र राऊळ, यशवंत कदम, संतोष सावंत, सचिन पालकर, तुषार परब, श्रीकृष्ण नेवगी, पिंटू उबारे, प्रियांका परब, सुरेखा बांदेकर, दीक्षा तवटे, निवास कारुडकर, मीनाक्षी राऊळ, श्रीकृष्ण परब, कृष्णा पंदारे, दीपक नाईक, अरविंद राणे, आनंद शेडगे, वनिता सावंत अजित परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा