You are currently viewing कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारत निधीस मंजुरी – रविंद्र चव्हाण

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन इमारत निधीस मंजुरी – रविंद्र चव्हाण

कणकवली

कणकवली येथील बांधकाम विभागाचे कार्यालय आता लवकरच नूतनीकरण करुन सुसज्ज होणार आहे. नवीन इमारत बांधण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली असून यासाठी ३ कोटी ९८ लाख १६ हजार रकमेच्या निधीस मान्यता मिळाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. त्यामुळे कणकवलीतील बांधकाम विभागाचे कार्यालय आता लवकरच सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीत पहायला मिळणार आहे.
याबाबत माहिती देताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंडळ, रत्नागिरी अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी ही दोन विभागीय कार्यालये कार्यरत आहेत. कणकवली कार्यालयाअंतर्गत ५ उपविभाग येतात. या उपविभागाकडे ९०६ किलोमीटर लांबीचे रस्ते तसेच जिल्हा मुख्यालयातील सर्व इमारती व तीन तालुका मुख्यालयातील इमारती देखभाल दुरूस्तीसाठी आहेत.
कणकवली येथील विभागीय कार्यालयाची बहुतांश जागा ही पनवेल पणजी, राज्यमार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाच्या कामात गेली. त्यामुळे कणकवली शहरात असलेल्या कार्यालयातील जागा कामकाजासाठी अपुरी पडत आहे, त्याचबरोबर पार्किंगची समस्यादेखील गंभीर आहे. तसेच कार्यालयाची आता असलेली इमारत फार जुनी आहे. त्यामुळे हे कार्यालय स्थलांतर करून नवीन इमारतीमध्ये कामकाज करणे आवश्यक होते. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून देखील तशी मागणी होत होती. त्यानुसार मुख्य वास्तूशास्त्रज्ञ यांच्याकडून प्राप्त नकाशानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यानुसार या कामाला मंजुरी देण्यात आली. प्रस्तावित नवीन इमारत ज्याठिकाणी बांधायची आहे, ती जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. ती जमीन कणकवली तालुक्यातील हळवल येथे असून तेथे कर्मचारी विभागाच्या दोन इमारती अस्तित्वात आहेत असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
सदर इमारत ही आरसीसीमध्ये बांधण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्र ३ मध्ये येत आहे. येथील वातावरणीय परिस्थिती मॉडरेट स्वरूपाची असल्याने आरसीसी कामासाठी काँक्रीट वापरण्यात येणार आहे. आरसीसी स्लॅबवर वॉटर फ्रुफींग करण्यात येणार आहे. बांधकाम जांभ्या दगडात व त्यावर एएसी ब्लॉकचा वापर करण्यात येणार आहे. अंतर्गत व बाहय गोलावा, रंगकाम तसेच फरशी बसविण्यात येणार आहे. अशी माहितीही मंत्री चव्हाण यांनी दिली आहे.

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा