You are currently viewing साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

कणकवली

सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून यानिमीत्ताने कणकवली नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून प्रा. प्रवीण बांदेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी नागरी सत्कार सोहळ्याला माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप (गोवा),इन गोवा २४×७ चे संपादक प्रभाकर ढगे,मराठीतील महत्त्वाचे कवी वीरधवल परब, कवी समीक्षक प्रा. डॉ.गोविंद काजरेकर, प्रा.डाॅ. शरयू आसोलकर, कवी अनिल धाकू कांबळी, कवी मोहन कुंभार ,अखंड लोकमंच कणकवलीचे नामानंद मोडक, नाटककार शफाअत खान आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा