*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर समूहाचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नक्षत्राचे देणे…!*
सुखाचे वाहतात…
जीवनात वारे…!
तव,भेटतात…
खुशाल,बोलणारे…!
दु:खात ‘तिळा’ने…
जाणंत नाही…!
किती, पाखडावे सुपाने…
जात्यात दळत नाही…!
डोळ्याने किती बघावे…
आरसा फुटूंन जाई…!
खुल्या मनाने जपावे…
वनव्यात,गेवराई…!
किती थांबवे, श्रावणाने…
कोकीळ, गात नाही…!
हे,नक्षत्राचे देणे…
असे,पुन्ह: येत नाही…!
………………………..
बबनराव वि.आराख
गांगलगाव
जि.बुलडाणा
७८७५७०१८०६