You are currently viewing सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला तर निफ्टी १७,७०० च्या वर

सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला तर निफ्टी १७,७०० च्या वर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

बेंचमार्क निर्देशांक ७ फेब्रुवारीला निफ्टी १७,७०० पर्यंत खाली घसरले.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याच्या चिंतेमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात एफएमसीजी, धातू आणि वाहन समभागांच्या विक्री झाली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले.

दि. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स २२०.८६ अंकांनी किंवा ०.३७ टक्क्यानी घसरून ६०,२८६.०४वर बंद झाला. सेन्सेक्समधील २२ कंपन्यांच्या समभागात घट झाली.

सेन्सेक्सवर्गवारीत टाटा स्टील डिसेंबर तिमाहीत कमकुवत आर्थिक परिणाम जाहीर केल्यानंतर सर्वाधिक ५.२३ टक्क्यांनी घसरला. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात घट आणि जास्त खर्च यामुळे कंपनीच्या नफ्यात घसरण झाली. त्यानंतर आयटीसी, सन फार्मा, मारुती, एम अँड एम, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, एचयूएल, भारती एअरटेल आणि रिलायन्स आदी कंपन्यांच्या समभागातही घट झाली. तर कोटक बँकेचा समभाग सर्वाधिक १.५९ टक्क्यांनी वाढला. त्यानंतर इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह, एलअँडटी, एसबीआय, टीसीएस आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागात वाढ झाली.

अदानी समुहातील प्रमुख अदानी एंटरप्रायझेसने घसरत चाललेला कल सोडला आणि दिवसभरात वरच्या सर्किटला धडक दिल्यानंतर समभागात १४.६३ टक्क्यांनी वाढ झाली. डिसेंबर तिमाहीत नफ्यात घट होऊनही अदानी पोर्ट्सचा समभाग १.३३ टक्के वाढला.

फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी व्याजदर योजनांबाबत केलेल्या भाषणाकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिल्याने जागतिक शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. विदेशी गुंतवणूकदारांनी बीएसईमध्ये सोमवारी १,२१८.१४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.७९ टक्क्यांनी वाढून ८१.७८ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले.

सेन्सेक्स २२०.८६ अंकांनी किंवा ०.३७ टक्के घसरून ६०,२८६.०४ वर तर निफ्टी ४३.१० अंकांनी किंवा ०.२४ टक्क्यांनी १७,७२१.५० वर घसरला. सुमारे १५५९ शेअर्स वाढले आहेत, १८५४ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १२४ शेअर्स अपरिवर्तित आहेत.

भांडवली वस्तू, रिअल्टी आणि खाजगी बँकिंग क्षेत्रांमध्ये किरकोळ नफ्यासह बहुतेक क्षेत्र तोट्यात गेले

भारतीय रुपया ८२.७३ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत प्रति डॉलर ८२.७० वर बंद झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा