You are currently viewing रमाई… रमाई…

रमाई… रमाई…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

रमाई… रमाई….

खूप काढले भाजून खूप सोसले चटके
उभा संसार पेलला नाही रूसली लटके
जया अंगी मोठेपण तया यातना कठिण
भीमरायामुळे मिळे रमाईला मोठेपण…

तुटपुंजा तो संसार किती जोडावी ठिगळे
शिष्यवृत्ती ती पुरेना तिथे सारेच पांगळे
गमावले लेकरांना चार डोळ्यांच्या समोर
किती शिवावा संसार लागे जीवा तिच्या घोर…

तिथे अर्धपोटी आहे परदेशात भ्रतार
येता आठव भीमाचा रमाईच्या डोळा धार
जातीपातीचे चटके रोज होते पाचविला
आगीतून फुफाट्यात वनवास तू भोगला…

बुद्धिवंत प्रज्ञावंत अडचणीत शिकला
घटनेचा शिल्पकार दुनियेत नावाजला
अग्निदिव्यातून गेली ससेहोलपट झाली
अपमृत्यू उपासमार कशी सामोरी तू गेली…

रमाबाई नि भीमाचा पत्रव्यवहार वाचावा
पिळवटे हृदय नि बांध कसा तो घालावा?
जातीतून भरडली गरिबीतही पिचली
घास घेतला दैवाने नाही त्यातून वाचली…

सुमती पवार नाशिक
७ जाने.२०२३(३:१७)

🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा