कणकवली
मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट मुंबई व सिंधुदुर्ग कला महाविद्यालय, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कला महोत्सव २०२३, प्रत्यक्ष शालेय चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले. या स्पर्धेकरीता सिंधुदुर्ग जिल्हयातील २३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या करीता प्रत्येक विभागानुसार अ,ब,क प्रथम पारितोषिक रू. २५१/- सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक, द्वितीय पारितोषिक रू. १५१/- सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक, तृतीय पारितोषिक रू. १०१/- प्रशस्तिपत्रक देण्यात आली.
विभाग “अ” १ ली ते ४ थी प्रथम- कु. मधुरा रंजण मल्हार, सेंट उर्सुला, द्वितीय – कु. देवार्य सुहास मुसळे, पोदार इंटरनॅशनल स्कूल, तृतीय – कु. मनस्वी दर्शन गोठणकर, आयडीयल स्कूल उत्तेजनार्थ – १) कु.नुरी असलम अर्थार, आयडीयल स्कूल उत्तेजनार्थ – २) कु. गणेश रूपेश राणे, पोदार इंटरनॅशनल स्कूल
विभाग “ब” ५ वी ते ७ वी- प्रथम – कु.मोहित निळकंठ सुतार, विद्यामंदिर, द्वितीय क्रमांक – कु. सोनिया विलिस चोडणेकर, सेंट उर्सुला,तृतीय क्रमांक – कु.गौरव मुकेश कांडगे, एस्. एम्. हायस्कूल उत्तेजनार्थ – १) कु.आर्या राजन साळगावकर, महालक्ष्मी कला अकादमी उत्तेजनार्थ – २) कु.पुर्वा संदीप पाचंगे, विद्यामंदिर इंग्लिश मिडियम
विभाग “क” ८ वी ते १० वी प्रथम – कु. दुर्वा रूपेश केळुसकर, सेंट उर्सुला, द्वितीय क्रमांक – कु.आर्यन सुनिल पवार, विद्यामंदिर हायस्कुल
तृतीय क्रमांक – कु. आर्या नितिन सातवसे, जे. एन्. व्ही. सिंधुदुर्ग उत्तेजनार्थ – १) कु. अजित रविंद्र कोळी, आयडीयल इंग्लिश स्कूल उत्तेजनार्थ – २) कु. यशश्री गोपीनाथ सावंत, विद्यामंदिर हायस्कुल यांनी प्राप्त केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिध्द कला दिग्दर्शक अशोक बाळकृष्ण साटम यांच्या हस्ते झाले यावेळी
विशेष अतिथी – माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक
अनंत राबाडे ,मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट
विश्वस्त ध्रुव नितीन जाधव, सिंधुदुर्ग कला महाविद्यालय, कणकवली प्राचार्य अनिल दावल, या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.या स्पर्धेचे परिक्षण प्राचार्यअनिल दावल
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक नितीन जाधव यांनी केले.