– जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस.नागरगोजे
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या शासकिय संस्थामध्ये ‘जागरुक पालक तर सुदृढ बालक’ या विषयी अभियान व आरोग्य तपासणी शिबीर गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस.नागरगोजे यांनी दिली.
‘जागरुक पालक तर सुदृढ बालक’ या शिबीराकरीता जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील सर्व लाभार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. बालकांच्या आरोग्याविषयी सुदृढता निर्माण होण्यासाठी पालकांनी जागरुक राहून आपल्या मुलांच्या वैद्यकीय समस्या जाणून घेऊन वेळेत लक्ष देऊन उपचार केल्यास निश्चितच बालकांमध्ये सुदृढता निर्माण होऊ शकते. तसेच जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निदान व उपचारासाठी या प्रत्येक संस्थामध्ये आरोग्य तपासणी व उपचार विशेष तज्ज्ञाद्वारे केले जाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
जिल्हा रुग्णालय ओरोस, उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी, महिला रुग्णालय कुडाळ, ग्रामीण रुग्णालय देवगड या पाच संस्थामध्ये दिनांक 9 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान यानुसार रक्तदान करण्याचे सहकार्य करावे.
या सर्व आरोग्य विषयक कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम एच पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहय संपर्क) डॉ. एस. पी. इंगळे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. एस. आर धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. श्याम पाटील, जिल्हा रुग्णालय यांनी केलेले आहे.