You are currently viewing बुमा एक्स्पोला इचलकरंजीतील प्रतिनिधींची भेट

बुमा एक्स्पोला इचलकरंजीतील प्रतिनिधींची भेट

इचलकरंजी / प्रतिनिधी

बिल्डर असोसिएशनची चौथी व्यवस्थापकीय समिती व सर्वसाधारण कार्यकारिणीची राष्ट्रीय बैठक एक्स्पो सेंटर, ग्रेटर नोएडा येथे उत्साहात झाली. यानिमित्त आयोजित बांधकाम विषयक यंत्रसामुग्रीच्या भव्य असे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘बुमा एक्स्पो’चे आयोजन केले होते. त्याला देशभरातून बांधकाम क्षेत्रातील प्रतिनिधींनी भेट दिली.

रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला. उत्तरप्रदेशचे उद्योगमंत्री नंदगोपाल गुप्ता, बुमा एक्स्पोचे चेअरमन अरविंद गर्ग, बिल्डर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष निमेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनात ६०० सप्लायर्स, दहा हजार प्रॉडक्ट्स, पाच हजारपेक्षा अधिक बायर – सेलर मीटिंग, – मल्टिपल कॉन्फरन्स व मशिनरींचे लाईव्ह डेमो पाहण्यास उपलब्ध केले होते. प्रदर्शनाला बिल्डर असोसिएशनच्या इचलकरंजी केंद्राचे अध्यक्ष नितीन धूत, उपाध्यक्ष फैयाज गैबान, प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय मुळे, मोहन सातपुते, तानाजी हराळे, पुंडलिक जाधव, मिलिंद नेमिष्टे , भगवान कांबुरे, प्रल्हाद माने, श्रीकांत लास्कर, मधुकर वाळकुंजे यांनी भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − twelve =