*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ.स्वाती घाटे लिखित काव्यरचना*
*अवतीभवती*
कायम होती हृदयामध्ये
पण कधी गाठभेट नाही
चार हात दुरून देखिल
पाहिली कधी थेट नाही
पार कळू लागण्याच्याही
आधीपासून किती
सतत अवतीभवती
ती इथेच तर होत
चंदाराणी पाहतांना
शुभंकरोती म्हणतांना
बाहुलीशी खेळतांना
पतंगामागे पळतांना
ती होतीच आजूबाजूला
मला वाढतांना पहाणारी
आत्या मावशांसारखी…लळा
दूरून सुद्धा लावणारी
मराठमोळी, मोठ्ठं कुंकू
काठाची साडी नेसणारी
गणपतीची पूजा, आरती
अभंग ओव्या म्हणणारी
ती तिथेच तर होती
मी तारूण्यात शिरतांना
नवनव्या भावकळा
अचानक बरसतांना
मुलगी, सून, ताई, आई
आणि कधी निव्वळ बाई
प्रत्येक भावरंग माझा
ती काळीज ओतून ओतून गाई
ती होतीच पावलागणिक
माझ्या सुखदु:खात साथीला
गोड गळ्याने तेल घालीत
माझ्या जीवन ज्योतीला
कोटी कोटी ज्योती फुलवून
आज अखेर ती विझली
गाऊन गाऊन थकली
आता थोडी निजली
शू:ऽऽ! …बोलू नका कुणी
करू नका आवाज
त्रिलोकात गुंजतोय, ऐका
तिच्या स्वरांचा साज
डाॅ. स्वाती घाटे
राजस्थान
६.२.२०२२
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*