देवगड
संविधान प्रचार आणि प्रसार अभियानांतर्गत श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था इचलकरंजी राज्य स्तरीय गौरव पुरस्कार सोहळा व एकल महिला सन्मान महोत्सव अंतर्गत सामाजिक कार्य करीत असताना निस्वार्थी कार्य व निष्ठा याची दखल घेऊन राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड चे सुपुत्र दयानंद यशवंत मांगले याना जाहीर करण्यात आला.
या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा इचलकरंजी येथील ना. बा.घोरपडे नाट्यगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी,स्वागताध्यक्ष माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर ,संस्थापक अध्यक्ष आई दुर्गा फाउंडेशन कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यास चंदूर बी शंकर महिला उद्योग अध्यक्षा सारिका पुजेरी,पोलीस मित्र समाजिक संघटन जिल्हा अध्यक्ष अस्मिता दिघे,वेदांत रोपवाटिका शिरवाड,विष्णू कुंभार,संचालक प्रमोद पाटील,प्रा. दीक्षा कदम,प्रा.डॉ अमर कांबळे ,
संस्थापक अभिजित फाउंडेशन ,बि.जी.देशमुख ,विठ्ठल ,कटेकरी,स्वाभिमानी चर्मकार संघ पालघर जिल्हा अध्यक्ष दिनेश भोईर,श्रावस्ती संस्था अध्यक्ष भक्ती शिंदे,उपाध्यक्ष भाग्यश्री कांबळे,सचिव राहुल वराळे उपस्थित होते.या निमीत्ताने उपस्थित पाहुणे मान्यवर यांचा संविधान प्रत देऊन सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात स्मिता पाटील कलापथकाने पुन्हा गांधी रिंगणनाट्य ,भारताच्या अमृतमहोत्सव निमित्त पथनाट्य हर घर संविधान हे सादर करण्यात आले.या निमित्ताने माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर दीक्षा कदम,अध्यक्ष भक्ती शिंदे यांनी मार्गदर्शन केले.या सोहळ्यात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकल महिला ,तसेच वैद्यकीय ,शैक्षणिक,सामजिक विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील ३५ हुन अधिक महिला पुरुष पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांचा सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.