You are currently viewing आंगणेवाडी यात्रेतून मालवण एसटी आगारास ७.२५ लाखांचे उत्पन्न

आंगणेवाडी यात्रेतून मालवण एसटी आगारास ७.२५ लाखांचे उत्पन्न

२७ हजार ३२१ प्रवाशांनी घेतला लाभ ; आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती

मालवण

आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रा मार्गावर रा. प. मालवण आगारातून ४५ एसटी बसच्या माध्यमातून विविध गावातून दोन दिवस सतत फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. यातून मालवण आगारास ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.

जादा वाहतूकीच्या माध्यमातून मालवण आगाराकडून १२ हजार १७८ किमी चालवून त्यातून ७ लाख २५ हजार ४४ रुपये उत्पन्न मिळाले. ५९.५४ पैसे प्रतिकिमी उत्पन्न व ९३.३६ एवढे भारमान मिळाले. विभाग नियंत्रक प्रशांत वासकर व विभागिय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीरीत्या जादा गाड्या व फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चालक, वाहक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यात्रा कालावधीत कोणतीही रा. प. बस मार्गस्थ बिघाड न झाल्याने यांत्रिक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यात्रा मार्गावर २७ हजार ३२१ भाविक प्रवाश्यानी एसटी बस वाहतूकीचा लाभ घेतला. त्याबद्दल आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी आभार मानले आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा