संपूर्ण कोकण विभागातून जिल्हयातील मान मिळवणारी एकमेव संस्था
१६ मार्च २०२३ रोजी म्हाबळेश्वर येथे पुरस्कराचे वितरण
सावंतवाडी :
बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अविज् पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्थांसाठी आयोजीत “बँको २०२२” हा मानाचा पुरस्कार कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेला जाहिर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी दिली.
संपुर्ण कोकण विभागातून जिल्हयातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. राज्यस्तरावर वेगवेगळ्या पतसंस्थाकडून मागविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, तज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेचा सातत्यपुर्ण वाढता आलेख, अभिमान वाटावा अशी सर्व आदर्श प्रमाणे व ऑडीट वर्ग “अ” संस्थेने कायम राखला आहे.
संपुर्ण प्रतिकुल, नकारात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करत संपुर्ण महाराष्ट्रात कॅथॉलिक पतसंस्थेने आपले स्थान अधोरेखीत केले आहे. आज संस्थेने राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच आपल्या ग्राहकांना वेगवेगळया नेट बँकिगच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत व सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
१६ मार्च २०२३ रोजी म्हाबळेश्वर येथे आयोजीत पतसंस्था सहकार परिषद २०२३ मध्ये मान्यवरांच्या हस्ते पुरस्कराचे वितरण होणार आहे. संस्थेला यापुर्वी देखील सलग चार वर्ष हा पुरस्कार मिळाला आहे. ग्राहकांचे संस्थेवरील प्रेम व विश्वास यामुळे संस्था सतत प्रगतीपथावर राहिली आहे. अशा या सर्व सभासद ग्राहक, संचालक व सर्व कर्मचा-यांचे अध्यक्षांनी मनपुर्वक आभार मानले आहेत.