*🙏 जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित भारतरत्न गानसम्राज्ञी लताजी मंगेशकर यांना आदरांजली*🙏
*हायकू स्वरलता*💐🙏
*ही स्वरलता
नादब्रम्ह स्वरूप
स्वर्गीय गाता!
स्वर माधुरी
रेशीम धागे जणू
आश्चर्य म्हणू!
आर्त ते गीत
तरल तेच भाव
ह्रदयी ठाव!
आमुचे पुण्य
त्या गानकोकीळेचे
सौख्य गीताचे!
स्वर विहार
सदैव ऐकलेला
मनी वसला!!
*****💐💐🙏💐💐***
अरूणा दुद्दलवार✍️